dr-Jayant-Naralikar

पार्श्वभूमी 

डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे घर उच्चविद्याविभूषित होते त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे गणिती आणि सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते ते बनारस हिंदू विद्यापीठात गणित विषयाचे विभाग प्रमुख होते त्यांची आई संस्कृत मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवीधर होती.

शिक्षण 

लहान जयंत अभ्यासात फार हुशार होते गणित हा त्यांचा आवडता विषय होता 1959 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएस्सी ओनर्स पूर्ण केले त्यांना वाचनाची खूप आवड होती ते विद्यापीठातून पहिले आले होते खगोल भौतिकशास्त्र आणि गणित हे त्यांचे विषय होते पुढील शिक्षणासाठी त्यांनी विदेशात जायचे ठरवले रेड होईल हे त्यांचे शिक्षक आणि मार्गदर्शक होते जयंत यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव होता पदवीच्या उत्कृष्ट निकालामुळे त्यांना स्कॉलरशिप भेटली पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला तिथे त्यांनी फक्त दोन वर्षात एम एस सी ची डिग्री पूर्ण केली पुढे फ्रेड हॉइल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करण्यासाठी त्यांनी नाव नोंदवले 1963 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून ते पीएचडी झाले. 

विदेशातील योगदान 

विदेशातील त्यांच्या पंधरा वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक पराक्रम केले अवघ्या 22 व्या वर्षी ते रॉयल एरोनॉटिकल सोसायटीचे सदस्य झाले किंग्स कॉलेजने त्यांची फेलो म्हणून निवड केली त्यांचे वडील देखील इथे मेंबर होते पीएचडी दरम्यान त्यांनी गुरुत्वाकर्षण दोन खगोलीय घटकांमधील गुरुत्वाकर्षण विश्वाची निर्मिती अशा गोष्टींवर अभ्यास केला त्यांनी बिग बँग थेरी वर देखील आपले मत मांडले बिग बँग थेरी असं सांगते की विश्व अजून देखील वाढत आहे पण नारळीकर यांच्यानुसार विश्व स्थिर आहे फ्रेडरिक होईल यांच्यासोबत त्यांनी प्रसिद्ध कॉल फॉर्मल थेरी ऑफ ग्रॅव्हिटी मांडली नारळीकर यांनी हायली यांच्यासोबत steady-state तेरी थेरी ऑफ ग्रॅव्हिटेशन इलेक्ट्रो डायनामिक्स अनेक विषयांवर काम केले डॉक्टर नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षण आणि वस्तूचे मास यांचा संबंध जोडला त्यांनी कृष्णविवर यावर देखील संशोधन केले त्यांच्या याच उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटी वेल एडम अवॉर्ड देऊन सन्मानित केले याआधी हा पुरस्कार डॉक्टर हुजुरबाजार होमी बाबा आणि डॉक्टर एस चंद्रशेखर या भारतीयांना मिळाला होता. 

पुढील योगदान 

dr-Jayant-Naralikar

मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च त्यांना खगोल भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होण्यासाठी निमंत्रित केले देशासाठी काहीतरी करायची इच्छा असल्यामुळे 1972 साली त्यांनी इन्स्टिट्यूट जॉईन केले पुढे भारतात आल्यावर त्यांनी विज्ञानाला आणि त्यातल्या त्यात खगोल भौतिक सत्राला प्रसिद्ध करण्यासाठी पुस्तके लिहायला सुरुवात केली त्यांनी आकाशाशी जडले नाते हे पुस्तक मराठीत लिहिले यामध्ये अनेक गोष्टी होत्या पुढे हे पुस्तक अनेक भाषेत अनुवादित झाले.

अंतराळ संशोधनात नारळीकरांनी नवीन पायंडा पाडला आहे. 1999 पासून ते सूक्ष्मजीव शोधण्यासाठी 41 किमी पर्यंतच्या उंचीवर हवेचे नमुने घेण्यासाठी डिझाइन केलेल्या शास्त्रज्ञांच्या बहु-संस्थात्मक संघाचे नेतृत्व करत आहेत. 2001 आणि 2005 मध्ये गोळा केलेल्या नमुन्यांच्या जैविक अभ्यासामुळे जिवंत पेशी आणि बॅक्टेरिया आढळून आले, त्यामुळे पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचा भडिमार होण्याची कुचकामी शक्यता उघड झाली, ज्यापैकी काहींनी येथे जीवसृष्टी निर्माण केली असावी.

पुरस्कार

2004 साली त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला 1988 साली त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲस्ट्रॉनॉमी याच यात भाग घेतला 10 जानेवारी 1989 ला नॅशनल सायन्स अकॅडमी ने नारळीकर यांचा मेडल देऊन सन्मान केला 1990 साल इ त्यांना सायन्स अकॅडमी नाही इंदिरा गांधी पुरस्कार प्रधान केला 2002 साली  त्यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार आणि 2003 मध्ये युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार प्रदान करण्यात आला अजूनही त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे असेच महान शास्त्रज्ञ भारताला लाभले पाहिजेत. ते भटनागर पुरस्कारप्राप्त आहेत, तसेच एमपी बिर्ला पुरस्कार, फ्रेंच अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे प्रिक्स जॅन्सन आणि लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहयोगी आहेत. 2011 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने सन्मानित केले. त्यांना महाराष्ट्र भूषण या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांचे अनेक पुस्तक इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध आहेत यक्षांची ची देणगी आकाशाशी जडले नाते नभात हसरे तारे हे काही प्रसिद्ध मराठी पुस्तके आहेत. नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान हे पुस्तक माझे आवडते पुस्तक आहे. या पुस्तकाची विशेष बाब म्हणजे हे समजण्यासाठी फार सोपे आहे. यात वीज्ञानातील काही संकल्पना फारच वेगळ्या प्रकारे मांडल्या आहेत.  एकदातरी हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला त्यांचे हे  पुस्तक आवडल्यास नक्की सांगा. 


त्यांची काही मला खूप आवडलेली इतर पुस्तके. 



0 टिप्पण्या