Jagdish-chandra-bose-information-in-marathi
jagdish chandra bose


Jagdish chandra Bose information in marathi- 

आज आपण त्या शास्त्रज्ञाबद्दल वाचणार आहोत ज्यांना आधुनिक भारताचे पहिले वैज्ञानिक मानले जाते, आणि झाडे आणि वनस्पतींमध्ये सुद्धा जीवन आहे हे ज्यांनी जगाला दाखवून दिले. त्यांचे नाव आहे डॉ जगदीशचंद्र बोस-Jagdish chandra Bose.

जगदीश चंद्र बोस यांचा जन्म| Birth of Jagdish Chandra Bose

 त्यांचे वडील भगवान चंद्र बोस एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात ढाका जिल्ह्यातील फरीदपूर नावाच्या ठिकाणी नायब दंडाधिकारी होते. भगवान चंद्र यांची पत्नी देखील एक दयाळू स्त्री होती. तिने 30 नोव्हेंबर 1858 रोजी जगदीश नावाच्या मुलाला जन्म दिला. त्यांची आई लहानपणापासूनच जगदीशला धार्मिक गोष्टी सांगायची, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांची धर्मावरील श्रद्धा, सात्विक भावना आणि देशभक्ती जागृत झाली.जगदीश चे लहानपणीपासूनच निसर्गावर वर प्रेम होते. सरकारी नोकरी मुळे जगदीशच्या वडलांना जो बंगला मिळाला होता त्या बंगल्यात एक मोठी चौकोनी खोली होती. त्या खोलीतून आजूबाजूचा परिसर दिसायचा. जवळच पदमा नदी वाहायची. सगळीकडे हिरवळ होती.

जगदीश चे बालपण| childhood of Jagdish Chandra Bose-

तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. वडील सरकारी नोकर होते पण पक्के देशभक्त होते. मुलांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी त्यांनी तिथे एक शाळा उघडली ज्यामध्ये मुलांना बंगाली भाषेतून शिकवलं जायचं. त्या शाळेत आजूबाजूचे गरीब विद्यार्थी येऊन शिकत. छोटा जगदीश पण तिथेच शिकू लागला. तो सुद्धा गरीब विद्यार्थयांमध्ये मिसळू लागला. त्यांच्या सोबतच खाणंपिणं असल्याने गरिबांच्या अडचणी त्याला पाहायला मिळाल्या. एवढच नाहि तर त्याने मच्छीमारांकडून नाव बनवणं आणि मासे पकडणं पण शिकून घेतल, शेतकऱ्यांकडून नांगर चालवणं शिकून घेतल आणि गुरांना चारण सुद्धा शिकला.

जगदीश लहानपणापासूनच जिज्ञासू होते. ते अनेक प्रश्न विचारायचे. काही प्रश्नांचे उत्तर वडील द्यायचे पण अनेक प्रश्न राहून जायचे. वयाने मोठे होणारे जगदीश उदार आणि देशभक्त होत होते. त्यांनी जास्तीत जास्त ज्ञान त्यांच्या मातृभाषेत प्राप्त केले. पुस्तकी किडा बनून ज्ञान मिळवण्यापेक्षा त्यांना चिंतन मनन करून ज्ञान प्राप्त करण्यात अधिक रस होता.


जगदीश चंद्र बोस यांचे शालेय शिक्षण| Jagdish Chandra Bose school education-

जगदीश ११ वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांची बदली कलकत्त्याला झाली. तिथे जगदीश यांनी सेंट झेवियर शाळेत प्रवेश घेतला. इथे गावापेक्षा फार वेगळी परिस्थिती होती. इथे त्यांच्यासोबत शिकणारे फक्त इंग्रजी बोलायचे. गावातल्या जगदीशला त्रास देणे, त्याची टिंगल करणे हे त्यांचे नेहमीचे उद्योग होते. याच मुळे एकदा जगदीश ची त्यांच्याशी मारामारी झाली. याच कारणांमुळे जगदीश ला फार मित्र नव्हते. छात्रालयात पण त्यांचा वेळ रिकामा जाऊ लागला. रिकाम्या वेळात ते वैज्ञानिक प्रयोग करू लागले.त्यांनी एका छोट्या डबक्यात मासे आणि बेडूक वाढवले. ते लहान लहान वनस्पती उखडून त्यांची मुळे पाहायचे. त्यांनी कबुतर आणि ससे देखील पाळले. यासर्वांमुळे त्यांची पर्यावरण आणि वनस्पतींमध्ये आवड खूप वाढली. 

अभ्यासात देखील जगदीश ला गती होती. १६ वर्षी त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास तर केलीच पण त्यांना स्कॉलरशिप देखील मिळाली. त्यांच्या प्रतिभेने त्यांनी सर्वांना पराभवीत करून सोडलं. 


                         https://youtu.be/gCEC2np-aBo

उच्च शिक्षण| Jagdish Chandra Bose higher education- 

पुढील शिक्षणासाठी त्यांनी सेंट झेवियर्स, कोलकत्ता इथे प्रवेश घेतला. तिथे भौतिक शास्त्राच्या एका  शिक्षकांचा जगदीश आवडता होता. त्यांचे नाव होते फतहेर लेकेन्ट. त्यांनी जगदीश ला भौतिक शास्त्राकडे वळवले. जगदीश ला भौतिक शास्त्रातही आवड निर्माण झाली. त्यांना हळूहळू सर्वच विषयात आवड निर्माण झाली. विज्ञान आणि गणित या विषयात तर ते अद्वितीय होतेच पण संस्कृत आणि लॅटिन भाषेवरही त्यांची घट्ट पकड होती. 

त्यांनी चांगल्या अंकांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांच्याकडे दोन पर्याय होते. एक होता सिव्हिल सेवा आणि दुसरा वैद्यकीय सेवा. तेव्हा देश पारतंत्र्यात होता त्यामुळे सिव्हिल सेवा म्हणजे गुलामगिरी स्वीकार करणे होते त्यामुळे त्यांनी दुसरा पर्याय निवडला. चांगले वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणे क्रमप्राप्तच होते. वडील भगवानचंद्र यांच्याकडे जगदीश ला विदेशात पाठ्वण्याइतके पैसे नव्हते. उच्चशिक्षणाच्या इच्छेसाठी जगदीश ची आई दागिने विकायला  तयार झाली. भगवान चंद्र यांनी कशीबशी पैशाची व्यवस्था केली. 

परदेशी प्रस्थान-

१८८० मध्ये २२व्या वर्षी जगदीश यांनी इंग्लंड मध्ये चिकित्सा विज्ञान शिक्षणासाठी रवाना झाले. तिथे त्यांनी भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पती विज्ञान यांचादेखील अभ्यास केला. पण वातावरण सहन न झाल्याने त्यांची तब्येत बिघडू लागली. पुढे आणखीनच बिघडू लागली. त्यांच्या अनॉटॉमी च्या शिक्षकांनी जगदीश ला सांगितले कि अशा खराब तब्येतीने तू वैद्यकीय शिक्षण पूर्ण नाही करू शकणार. शेवटी जगदीश यांनी वैद्यकीय शिक्षण सोडून दिले. 

१८८१ मध्ये त्यांनी क्राईस्टचर्च कॉलेज इथे प्राकृतिक विज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात केली.त्यांना लॅटिन आधीपासूनच येत होती. तिथे स्कॉलरशिप मिळवून त्यांनी केम्ब्रिज ला प्रवेश घेतला. केम्ब्रिज येथे त्यांना अनुकूल वातावरण मिळाल्याने त्यांची तब्येतीत  सुधारणा होऊ  लागली. इथे त्यांचा मित्र परिवार वाढला. इथे त्यांना वैज्ञानिक विषयांवर गंभीर चर्चा करण्याची व विद्वानांचे व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. १८८४ मध्ये प्राकृतिक विज्ञान विषयात केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी मिळवली आणि ते भारतात येण्यासाठी रवाना झाले. 


स्वाभिमानी जगदीश-

भारतात आल्यावर शिमला येथे त्यांनी व्हाइसरॉय ची भेट घेतली. त्यांच्या प्रतिभेने व्हाइसरॉय प्रभावित झाला. व्हाइसरॉय ने त्यांना इंपिरिअल एजुकेशन सर्विसेस मध्ये उचित पदावर नियुक्ती देण्याचं आश्वासन दिल पण काही कारणास्तव त्यावर अंमलबजावणी होऊ शकली नाही. जगदीशचंद्र यांनी नंतर कलकत्ता येथील प्रेसिडेंसि कॉलेज मध्ये भौतिकशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नोकरी स्वीकारली. इथे त्यांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. भारतीय प्राध्यापकांना इंग्रज प्राध्यापकांपेक्षा एक तृतियांश वेतनच मिळत होते. स्वाभिमानी जगदीश चंद्र यांना हे  मुळीच मान्य नव्हते. त्यांनी वेतन स्वीकारायला नकार दिला आणि कडाडून विरोध केला पण आंदोलन करून नाही तर शिकवून. शेवटी त्यांच्या समोर संचालक मंडळ झुकले आणि हि चुकीची प्रथा बंद झाली. 


Jagdish Chandra Bose contribution in physics|भौतिकशास्त्रातील योगदान -

Jagdish-chandra-basu

जगदीश चंद्र यांना अभ्यासाची पारंपारिक पद्धत आवडायची नाही. सलग संशोधन करण्यासाठी त्यांना स्वतःच्या प्रयोगशाळेची आणि उपकरणांची गरज होती. सलग ८-१० वर्ष त्यांनी आपल्या पगारातून एक एक पैसा वाचवून स्वतःची प्रयोगशाळा उभारली. त्यांना आवश्यक असणारे अनेक उपकरणे देखील ते स्वतःच बनवायचे. स्वतःची प्रयोगशाळा उभारल्यानंतर जगदीशचंद्र विजेच्या वेगाने संशोधन कार्याला लागले. लवकरच त्यांना प्रकाश किरणांवर त्यांच्या संशोधनाशी निगडित एक उपकरण बनवण्यात यश आले. ब्रिटन ची प्रतिष्ठित रॉयल सोसायटी जी विज्ञानातील विश्वातली सर्वात जुनी संस्था होती तिने त्यांच्या शोधाच्या प्रकाशनाला मंजूरी देखील दिली. १८९६ मध्येच लंडन युनिव्हर्सिटीने त्यांचा शोध लेख डीफ्रॅकटिंग ला प्रोफेसर ग्रेटींग कडून विद्युत लहरींच्या लांबी वर त्यांना डी एस सी ची डिग्री दिली . त्यासाठी जगदीश यांना परीक्षेला बसण्याची गरज देखील नाही पडली. लॉर्ड क्यूलवेल ने त्यांच्या कामाचे तोंड भरुन कौतुक केले. फ्रांसिसि अकादमी ऑफ सायन्स चे माजी अध्यक्ष कास्टू यांनी देखील त्यांच्या कामाचे तसेच त्यांच्या उपकरणांचे कौतुक केले.  

इलेकट्रो मॅग्नेटिक लहरींवर संशोधन-

इलेकट्रो मॅग्नेटिक लहरींवर सर्वप्रथम व्याख्या ब्रिटिश शास्त्रज्ञ क्लार्क मॅकवेल ने दिली होती. त्यांनी सांगितले कि या लहरी एकसारख्या असतात आणि यांमध्ये प्रकाशाचे काही गुण देखील यात बघायला मिळतात  जसे कि परावर्तन, अपवर्तन. जगदीश चंद्र यांनी पुढे संशोधन करून हे सांगितले कि प्रकाश लहरींसारख्याच या लहरी देखील सरळ रेषेत प्रवास करतात. त्यांनी हापण शोध लावला कि जसे प्रकाश आरशातून परावर्तित होतो आणि चमकदार वस्तूमधून अपवर्तित होतो तसेच या लहरी देखील करतात. त्याच बरोबर त्यांनी काही महत्वपूर्ण फरक देखील सांगितले जसे कि पाणी प्रकाश लहरिंकरिता स्वच्छ असते आणि प्रकाश त्यातून अपरावर्तीत होतो त्याच प्रकारे विट आणि कोळसा यांमधून विजेच्या लहरींचे अपवर्तन होते.  

विद्युत लहरींवर संशोधन-

हर्ट्झच्या लांब रोहयो लहरींची नोंद करू शकणारी अशी अनेक उपकरणे त्यांनी तयार केली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचे ध्रुवीकरण करण्यातही ते यशस्वी झाले.त्यांनी मेलाइट नावाच्या विशेष स्फटिकचा शोध लावला, जो प्रकाश किरणांप्रमाणेच विद्युत लहरींना निर्देशित करतो. त्यांच्या या शोधामुळे  संचार क्षेत्रातील क्रांती ला नवी दिशा मिळाली. १८९८ पर्यंत ते विश्वविख्यात झाले होते.


जेवढे प्रशंसक तेवढेच विरोधक-

रॉयल सोसायटी चे लॉर्ड रेले आणि केल्विन त्यांचे मोठे प्रशंसक होते. जेव्हा कलकत्त्यातील टाउन हॉल मध्ये त्यांनी गव्हर्नर समोर त्यांचे प्रयोग सादर केले तेव्हा तो देखील त्यांचा प्रशंसक झाला. पण त्यांचा शिक्षण विभाग त्यांच्यावर चिडायचा. कारण ते एक स्वाभिमानी वैज्ञानिक होते. म्हणून ते अधिकाऱ्यांच्या हो मध्ये हो मिळवत नव्हते आणि त्याचमुळे त्यांची बढती थांबवून ठेवण्यात आली. आपले संशोधन जगाला दाखवण्यासाठी त्यांना १ वर्षांची सुट्टी हवी होती पण त्यांना ६ महिन्याच्या सुट्टीचीच परवानगी मिळाली. जेवढे त्यांचे प्रशंसक होते तेवढेच त्यांचे पाय ओढणारेही कमी नव्हते. 

Jagdish chandra bose
expert in physics converted to biology

जीवशास्त्रात नवी सुरुवात| Jagdish Chandra Bose Career in Biology-

आता त्यांनी भौतिकशास्त्रापासून थोडं बाजूला होऊन बायोफिजिक्स मध्ये पाऊल ठेवले. त्यांचे लहानपणापासूनच जीव जंतूंवर अधिक प्रेम होते. जर त्यांच्या कॉलेज च्या दिवसात त्यांच्या जीवशास्त्राच्या अभ्यासाची चांगली सोय झाली असती तर कदाचित त्यांनी भौतिक शास्त्रात पाऊलच ठेवले नसते. 

सन १९०० मध्ये पॅरिस च्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संमेलनात सहभागी होण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने ते कलकत्ता युनिव्हर्सिटी चे प्रतिनिधी म्हणून तिथे सहभागी झाले. तिथे त्यांना बोलणयासाठी खूप कमी वेळ दिला गेला पण त्यांनी त्या थोड्या वेळात देखील सर्वांना मंत्रमुग्ध केले.  स्वतः स्वामी विवेकानंद तिथे उपस्थित होते. विश्वातल्या अनेक वैज्ञानिकांनी त्यांना पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.पॅरिस मधून लंडन येथे त्यांना संशोधन करण्याची संधी प्राप्त झाली. रवींद्रनाथ टागोर यांच्याशी विचारविमर्श करून ते लंडन येथे शोधकार्यासाठी रवाना झाले. त्यांनि असे उपकरण बनवले जे झाडाच्या वाढण्याच्या वेगाला १ करोड पट मोठे करून दाखवेल.  उपकरणाच्या सहाय्याने वनस्पतीच्या हालचालीचा एक हजारावा भाग देखील पाहणे शक्य होते. वनस्पतीला उत्तेजित करून वाढ किंवा घट होण्याचा दर मोजण्यासाठी त्यांनी संतुलित कॉस्कोग्राफ देखील तयार केला.या उपकरणाची फार प्रशंसा झाली.

आता भौतिक विज्ञानासारखेच जीव शास्त्रात देखील त्यांचे एका नंतर एक शोध पत्र प्रकाशित होऊ लागले. पुढे त्यांनी झाडांच्या हालचालींचे अध्ययन करणे चालू केले. त्यांनी हे सिद्ध केले कि जसे प्राणी पक्षी आपले जीवन जगतात तसेच वनस्पती देखील जगतात. 

जगदीश चंद्रांबरोबरच आणखी 5 शास्त्रज्ञांचे प्रेरणादायी आयुष्य जाणून घ्या अतिशय स्वस्त दरात. फक्त ३२० रुपयात ६ पुस्तके. काही पुस्तके बेस्टसेलर आहेत. लगेच घ्या. किंमत लहान पुस्तके महान. 


जगदीश चंद्रांचा आत्मविश्वास|Self confidence- 

त्यांच्या अभ्यासावर त्यांना इतका विश्वास होता कि एकदा त्यांनी आपला शोध सार्वजनिक ठिकाणी सादर करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या संख्येने वैज्ञानिक आणि सामान्य नागरिक प्रयोग बघण्यासाठी एकत्र जमले. जगदीश चंद्र यांना हे सिद्ध करायचे होते कि वनस्पतींना देखील वेदना होतात. त्यांनी एका झाडाला विष असलेले इंजेकशन दिले. काही सेकंदातच ते झाड कोमेजून जायला हवे होते पण तसे झाले नाही. सगळे उपस्थित लोक जगदीश यांची मस्करी करून हसू लागले.  जगदीश चंद्र मुळीच विचलित झाले नाही. पूर्ण विश्वासाने ते म्हणाले कि जर हे विष वनस्पतीला काही करू शकत नाही तर ते मला देखील काही करू शकत नाही. असे म्हणून ते स्वतःला देखील ते इंजेकशन टोचून घ्यायला तयार झाले. तेव्हाच कोणीतरी गर्दीतून पुढे आले आणि आपली खोडी मान्य केली आणि सांगितलं कि विषाच्या बाटलीत त्याने त्याच रंगाचं पाणी भरल होत. जेव्हा बोस यांनी खर विष वनस्पतीला दिल तेव्हा लगेच ते झाड कोमेजून गेलं. 


लाजाळू च्या झाडावर संशोधन-

झाडाझुडपांवर ते सलग संशोधन करत गेले आणि त्यांचे संशोधन हे शोधपत्रांच्या रूपाने पुढे येत गेले. झुडपांची संरचनासूर्यप्रकाशाचा त्यांच्यावर होणारा प्रभाव यावर ते जगाला नवनवीन माहिती देऊ लागले. त्यांनी जगाला हे सांगितले कि रात्री वनस्पती थोड्या आखडतात आणि प्रकाशाच्या दिशेने जातात मग भले त्यांना प्रकाशाच्या दिशेने वळावं लागो. लाजाळू च झाड पाहून सर्वांना आश्चर्य वाटायचे. बोस यांनी त्यावरही संशोधन केले. खूप आभ्यासानंतर त्यांनी हे सिद्ध केले कि सर्वच वनस्पतींचे पानं काही शिवल्यावर थरथर कापतात पण त्यांची हालचाल इतकी सूक्ष्म असते कि ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही आणि लाजाळू च्या झाडाची दिसते. 


अभ्यासाची नवी दिशा आणि निवृत्ती -

Biophysics


आधी भौतिकशास्त्र आणि नंतर जीवशास्त्र यांचा अभ्यास करून त्यांनी दोघांचा समावेश करून अभ्यासाची एक नवी दिशा काढली. त्यांनी वनस्पतींची निद्रा, वायू, प्रकाश, औषधी, भोजन, थकावट, उत्तेजनशीलता दर्शवणाऱ्या यंत्रांचा शोध लावला. यामध्ये प्रामुख्याने रेसोनेंट रेकॉर्डर, फाईटोग्राफ, फोटो सिंथेसिस रेकॉर्डर यांचा समावेश होतो.  १९०७ मध्ये भारत सरकारने त्यांना इंग्लंड ला पाठवले तिथे त्यांनी आपल्या संशोधनाचे प्रदर्शन केले. तिथून ते अमेरिकेला गेले जिथे त्यांचं भव्य स्वागत झाल. १९०९ ला ते भारतात परत आले. १९१३ मध्ये ते नियमानुसार निवृत्त होणार होते पण सरकारने त्यांची निवृत्ती पुढे ढकलली आणि जेव्हा १९१५ मध्ये त्यांना निवृत्ती मिळाली तेव्हासुद्धा सरकारने त्यांना पूर्ण वेतन देणे सुरूच ठेवले. 


निवृत्ती नंतरचे संशोधन कार्य-

निवृत्तीनंतर त्यांनी आपली जमवलेली संपत्ती आणि काही राजांकडून मिळवलेली मदत यांच्या सहाय्याने कलकत्त्यामध्ये बॉस अनुसंधान संस्थान याची स्थापना केली आणि मरेपर्यंत इथेच काम करत राहिले जगदीश चंद्र बोस एक उत्तम लेखक होते त्यांचे लेख जर्मनी फ्रान्स इंग्लंड या देशांच्या अग्रणी वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये छापून यायचे त्यांचे 10 पुस्तक प्रकाशित झाले होते त्यांना साहित्य आणि बांगला भाषा यांच्या प्रती फार प्रेम होते बंगिया साहित्य परिषद याचे ते सभापती देखील होते रवींद्रनाथ टागोर यांची त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती आणि ते त्यांच्याशी साहित्यावर चर्चा करायचे


देशभक्त जगदीश-

जगदीश चंद्र बोस हे कट्टर राष्ट्रवादी होते इंग्रज शासन त्यांना बिलकुल मान्य नव्हते ते स्वातंत्र्यसंग्रामात उघड पणाने भाग घेऊ इच्छित होते पण स्वामी विवेकानंद यांनी त्यांना थांबवले आणि तुझं विज्ञानच तुझी राष्ट्रीयता आहे आणि तू याच क्षेत्रात कार्य कर असे सांगितले.1913 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या अभिनंदन सभेत नेताजी सुभाष चंद्र बोस असे म्हणाले की मी प्रोफेसर बसू यांच्याकडून कठीण परिस्थितीत देखील ताठ मानेने कसं चालायचं हे शिकलो आहे.


पैशाची इच्छा नाही-

जगदीश चंद्र बोस यांना पैसे कमवायचे कधीही इच्छा नव्हती आपल्या अनेक शोधन मधून त्यांनी काहीही पैसा मिळवला नाही त्यांचं आयुष्य खुप गरबीत गेलं अनेक ब्रिटिश उद्योगपतींनी त्यांच्या प्रयोगांसाठी भरभक्कम रक्कम चा प्रस्ताव दिला पण जगदीश चंद्र यांनी तो साफ फेटाळून लावला त्यांना प्रयोग प्रिय होते आणि संशोधन करायचे पण पैशाच्या इच्छेने नाही.


शेवट|Death-

जगदीश चंद्र बोस हे आपल्या आयुष्याचे शेवटचे चार वर्ष आजारी राहिले कलकत्त्याच्या वातावरणाला अनुकूल न समजून ते बिहार मधील गिरणी याठिकाणी विश्रांती करायला गेले 22 नोव्हेंबर 1937 ला पेपरात कलकत्त्याला आले 22 नोव्हेंबर 1937 या दिवशी त्यांनी बसू संस्थानाच्या पत्रिकेतील प्रूफ वाचला त्यानंतर त्यांनी ग्रामोफोन वर जनगणमन आणि वंदे मातरम् ऐकले दुसर्‍याच दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबर ला सकाळी स्नानागारात पडून त्यांचे निधन झाले.

 एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ने त्यांच्यावर अशी टिपणी लिहिली आहे की जगदीश चंद्र बोस यांचे शोध काळाच्या एवढे पुढे होते की त्यांचं मूल्यांकन करणे त्यावेळी शक्य नव्हतं.

Great-Indian-Scientists
Great Indian Scientists


Read about Aryabhatta in marathi|आर्यभट्टांविषयी मराठीतून माहिती वाचण्यासाठी-https://indianscientist2021.blogspot.com/2021/10/aryabhatta-information-in-marathi.html


 डॉ जयंत नारळीकर मराठीतून वाचण्यासाठी - 
https://indianscientist2021.blogspot.com/2022/03/Dr.-Jayant-Naralikar-information-in-marathi.html



वाचा थोर शास्त्रज्ञ मराठीत- 


0 टिप्पण्या