Technical-fundamental-analysis
Technical analysis vs fundamental analysis 

Share market in marathi 

पार्श्वभूमी-

कोरोना नंतर शेअर मार्केट मध्ये अनेक तरुण गुंतवणुकीसाठी पुढे आले. डी- मॅट अकाउंट उघडणे, माहिती घेणे याने जोर पकडला. बरेचदा पाहतो कि तरुण मंडळी टेक्निकल ऍनालिसिस कडे जास्त वळताना दिसतात आणि फंडामेंटल बद्दल फार काही माहीत नसते. अशा वेळी नवीन लोक मार्केट मध्ये पैसे गमावून बसतात. ज्या समस्या मला सहन कराव्या लागल्या त्या इतरांना सहन कराव्या लागू नये म्हणून हा लेख. 

https://www.youtube.com/channel/UCCP3i7d-EugdZomFUVCjrXQ/ - हे माझे चॅनेल आहे. शेअर मार्केट साठी पाहू शकता. 

काय आहे टेक्निकल ऍनॅलिसिस?-

Technical-analysis
Technical analysis

आजकाल जी गुंतवणुकीची पद्धत नवीन लोकांमध्ये दिसून येत आहे ती आहे टेक्निकल ऍनॅलिसिस. या पद्धतीत चार्ट चे आकलन करून, वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षण नोंदवून जर काही विशिष्ट पॅटर्न तयार होत असतील तर त्यावर शेअर घ्यायचा कि नाही याचा निर्णय घेऊन गुंतवणूक करतात. या पद्धतीत कॅन्डलस्टिक चार्ट मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक्स रे पाहून कोणता रोग झाला आहे? हे पाहून पुढील उपचार करण्यासारखे आहे. अनेक लोक यामध्ये उत्कृष्ट अभ्यास करून दमदार पैसे कमावतात. जे लोक शॉर्ट टर्म मिड टर्म मध्ये गुंतवणुकीसाठी संधी पाहात असतात ते या पद्धतीचा अधिक वापर करतात.  

काय आहे फंडामेंटल ऍनॅलिसिस?-

Fundamental-analysis

फंडामेंटल ऍनॅलिसिस मध्ये आपण शेअर न घेता कंपनी विकत घेत आहोत असे समजून, संपूर्ण कंपनी ची माहिती काढून माहिती घेतात. कंपनीची मॅनेजमेंट, पैशाचे व्यवहार याची संपूर्ण माहिती घेतली जाते. कंपनी मोठी होईल तेवढा नफा वाढणार असा यामागील दृष्टिकोन असतो. अर्थव्यवस्था,कंपनीची नफ्यात राहायची क्षमता, तिची प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध उभे राहण्याची क्षमता, नवीन प्रकल्प आणि असे अनेक आयामांनी विचार केला जातो.   दीर्घकालीन(लॉन्ग टर्म) गुंतवणूकदार या पद्धतीचा  अवलंब करतात. 

गैरसमज-

नेमके टेक्निकल आणि फंडामेंटल ऍनॅलिसिस म्हणजे काय हे वरवर जरी समजले तरी आपण हे नक्की म्हणू शकतो कि दोघांना काही मापक आहेत आणि त्यांच्या आधारावरच निर्णय घेतले जातात. आपल्या डोक्यात आधीपासूनच हे घुसवले जाते कि फंडामेंटल साठी कोणीतरी अर्थशास्त्रातला ज्ञानी असावा लागतो त्यामुळे असा समज आधीपासूनच होतो कि हे आपल्यासाठी नाही. परिस्थिती अशी नाही. टेक्निकल ऍनॅलिसिस बद्दल बरोबर यांच्या उलटा गैरसमज होतो कि हे खूप सोपे आहे आणि काही दिवसात हे आपण करून घेऊ पण जेव्हा करायला जातो  तेव्हा खरी परिस्थिती समोर येते. एकदा का तोटा होताना दिसला कि स्टोपलॉस वर विकायलाही मन करत नाही आणि सगळे ट्रेडर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर सांगतात. मुळात सोपा आणि अवघड असा हा विषयच नाही, कुठल्या मार्गाने जास्तीत जास्त नफा कमावता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न. 

ज्याचा त्याचा प्रश्न- 

शेवटी कोणी कुठल्या पद्धतीने गुंतवणूक करायची हे आपले आपणच ठरवायचे असते आणि कोणीही सांगितले तरी त्याचे आंधळेपणाने ऐकायचे नसते. काही मापकांवर आपण दोन्ही प्रकारचे अनालिसिस तापासु या आणि त्यातले जे जे तुम्हाला लागू होईल तशी तुम्ही मदत घेऊ शकता.  

मापक १- वेळ 

Time-management
Tme

वेळेच्या बाबतीत सांगायला झाल तर जे इंट्राडे ट्रेडर असतात, ते सर्व टेक्निकल ऍनॅलिसिस वापरतात आणि सेकंदा सेकंदाच्या किमतींवर त्यांचे लक्ष असते. अर्थातच ते खूप जास्त वेळ मार्केट मध्ये घालवतात. शॉर्ट आणि मिडीयम टर्म गुंतवणूकदार देखील रोजच्या रोज किमती तपासून पुढे काय करायचे हा अभ्यास करत असतात. जरी ते मार्केट मध्ये फार वेळ नसले तरी दिवसातून एकदा तरी ते पूर्ण अभ्यास करून पुढची दिशा ठरवतात. याउलट फंडामेंटल ऍनॅलिसिस करणाऱ्या  गुंतवणूकदारांना रोज रोज किमती पाहण्याची गरज नसते. पण जेव्हा जेव्हा त्रैमासिक निकाल किंवा अन्युअल रिपोर्ट येतो त्यात मात्र ते आवर्जून लक्ष घालून पुघील दिशा ठरवतात. रोज रोज जरी किमती तपासात नसले तरी जेव्हा जेव्हा अभ्यासाची वेळ येते तेव्हा तेव्हा त्यांना जास्त वेळ द्यावा लागतो. तीन महिन्यातून एकदा दोनदा खूप वेळ देणे तुम्हाला जमते कि रोज रोज थोडा थोडा वेळ देणे? ज्याचा त्याचा प्रश्न.
या बाबतीत तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते कमेंट मध्ये नक्की कळवा.



ऐका भगवद्गीतेचे काही श्लोक आणि अर्थ काही वेळात- https://youtube.com/channel/UC0MriNgbc1TNLG5QyEQ4sRQ

 मापक २-साधन

वर सांगितल्या प्रमाणे टेक्निकल ऍनॅलिसिस साठी चार्ट हे सर्वात महत्वाचे मापक आहे. चार्ट, त्यावर चित्रे काढणे, विविध इंडिकेटर वापरणे हे टेक्निकल ऍनॅलिसिस साठी लागणारी प्राथमिक साधने आहेत. फंडामेंटल साठी अन्युअल रिपोर्ट, निकाल, काही इतर मापके, रेशो हि साधने आहेत. तंत्रज्ञानामुळे आजच्या काळात दोन्ही साठी साधने मिळवणं फार अवघड नाही असा चित्र आहे. इंटरनेट मुळे माहिती मिळवणे जास्त सोपे झाले आहे. टेक्निकल साठी काही वेबसाईट आणि अप्लिकेशन उपलब्ध आहेत आणि फंडामेंटल साठीही कंपन्यांचे निकाल आणि आणखी काही गोष्टी या कंपनीच्या वेबसाईट वर असतातच.  दोन्ही पद्धतीत साधने किमान प्राथमिक पातळीपर्यंत सहजतेने उपलब्ध आहेत आणि जर थोडे ऍडव्हान्स व्हायचे असेल तर थोडा फार खर्च येतो.

मापक ३- ताण तणाव

Tension


हे मापक अतिशय महत्वाचं आहे. टेक्निकल  ऍनॅलिसिस चा आधार घेणारा गुंतवणूकदार आणि त्यातही तो जर इंट्राडे किंवा स्विंग ट्रेंड करणारा असेल तर त्याला मार्केट मधील चढ उतारांचा खूप सामना करावा लागतो. अशा वेळेस मात्र पोजीशनल ट्रेंड करणारा कमी तणावात असतो पण तरी वरवर कल्पना केली तरी फंडामेंटल्स चा आधार घेणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारापेक्षा तो जास्तच तणावात असतो. त्यामुळे तणावाच्या बाबतीत फंडामेंटल अनालिसिस करणारा कमी तणावात असतो. टेक्निकल चा आधार घेणार्याला खरेदी विक्री चे निर्णय देखील अधिक घ्यावे लागतात. या बाबतीत तरी फंडामेंटल चा विजय होताना दिसत आहे. 

मापक ४- स्क्रीन टाइम-

वरचे मापक वाचल्यावर कदाचित हे तुम्ही ओळखलेच असेल कि नेमका कोणाचा स्क्रीनटाइम जास्त असेल? निश्चितच टेक्निकल चा स्क्रीनटाईम जास्त असेल. तुम्हाला स्क्रिन मानवते कि नाही यावर तुम्ही नक्की निर्णय  शकता.

मापक ५- मजा 

Enjoy
मजा


अर्थातच मार्केट मध्ये  कोणी मजा करण्यासाठी येत नसतो पण मी पाहिल्याप्रमाणे काही लोकांना मार्केट मधल्या चढ उतारांमध्ये थ्रिल वाटत. या थ्रिल मुले पैसे कमावताना मजा हि येऊ शकते किंवा रडायची पाळी देखील येते. काही एक्स्पर्ट असे म्हणतात कि जो पर्यंत थ्रिल वाटणे बंद होत नाही तो पर्यंत फार चांगला नफा कमावता येणार नाही, बोर झाल्यावर खरी कमाई सुरु होते. हे झाले टेक्निकल च्या बाबतीत पण काही दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कंपनी च्या वार्षिक सर्वसाधारण मिटिंग मध्ये सहभागी होणे, अन्युअल रिपोर्ट घरपोच येणे किंवा रिजल्ट्स चा मेल येणे यात अधिक आनंद वाटत असावा. पण नक्कीच हेही फार व्यक्ती व्यक्ती नुसार बदलत जाते. पण तरी माझ्या अनुभवानुसार फंडामेंटल ऍनॅलिसिस मध्ये मजा अशी काही नसते.   

मापक ६- ज्ञान

टेक्निकल एनालिसिस मध्ये ९९% निर्णय फक्त चार्ट वर घेतले जातात आणि त्यामुळे इतर काही माहिती मिळण्यासाठी स्कोप नक्की फार लिमिटेड होतो. याउलट जर फंडामेंटल अनालिसिस नुसार आपण पाहायला गेलो तर अर्थव्यवस्था, कंपनी मॅनेजमेंट, प्रोडक्शन, बॅलेन्स शीट, कॅश फ्लो हे सगळे वाचण्यात तरी येते. या मध्ये कंपनी काय करणार आहे. सरकार कडून या क्षेत्रात काय चालू आहे या सगळ्याची किमान प्राथमिक माहिती आपल्याला  मिळते. किमान एक ढोबळमानानुसार आपल्याला अंदाज येतो. आपल्याला जरी काही माहिती नसली तरी प्राथमिक माहिती मिळू शकते. 
नक्कीच माहिती च्या मुद्द्याला या वाक्याने विरोध होऊ शकतो कि आम्ही शेअर मार्केट मध्ये ज्ञान मिळवायला नाही तर नफा कमवायला येतो. तरी माझ्या मते नफा मिळवणे हि वेगळी गोष्ट पण एखाद्या क्षेत्राची प्राथमिक माहिती मिळवणे काय वाईट. त्यातल्या त्यात जे विद्यार्थी आहेत त्यांनी फंडामेंटल ऍनॅलिसिस च्या आधारे गुंतवणूक केली नाही तरी किमान काही कंपन्यांचे फंडामेंटल ऍनॅलिसिस करावे. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही. 

शेवट

या काही मापकांवर तुम्ही हे ठरवू शकता कि तुम्हाला कोणती पद्धत सूट करेल. एक सांगायचे आहे कि दिलेली माहिती हि फार प्राथमिक स्वरूपाची आहे. माहिती च्या मी  अजून फार खोल गेलेलो नाही. हि माहिती फार नवीन लोकांसाठी प्राथमिक स्वरूपात द्यायची म्हणून दिलेली आहे. थोड्या जुन्या गुंतवणूकदारांसाठी हि माहिती कदाचित शिळी वाटेल हे नक्की. 

मी शेअर मार्केट वर अजूनही लेखन करू शकतो किंवा जर पूर्ण बेसिक असताल तर आपण एक विडिओ मीटिंग पण घेऊ शकतो त्यासाठी मात्र तुम्हाला contact us च पेज भराव लागेल.  



disclaimer- We are not SEBI registered investment adviser. Please take your own decision. We will not be responsible for any of your losses. 
Share market investments are subject to market risk. please make all your investments after consulting your financial adviser.


0 टिप्पण्या